भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:40 PM2020-04-29T19:40:02+5:302020-04-29T19:44:50+5:30

इंदापुर तालुक्यातील भिगवण परिसरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

Corona test of 18 people in that bhigvan area patient's 'high' contact | भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी

भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी

Next
ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कातील एकुण ३२ जण क्वारंटाईन परिसरात पुढील तीन दिवस काटेकोर बंद पाळला जाणारदवाखाना आणि मेडिकल वगळता सर्व व्यवसाय काटेकोरपणे बंद ठेवण्यात येणार

भिगवण: इंदापुर तालुक्यातील  भिगवण स्टेशन येथील कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.यामध्ये कुटुंबातील चार जणांना औंध पुणे येथे कोरोना तपासणी नमुना घेण्यासाठी नेण्यात आले आहे .तर संपर्कात आलेल्या १४ जणांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये तपासणी करून कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला आहे.या सर्वांना तपासणी अहवाल येईपर्यंत हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.तसेच रुग्णाच्या संपर्कातील एकुण ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे,अशी माहिती भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. अमित उदावंत यांनी दिली .
इंदापुर तालुक्यातील भिगवण परिसरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ माजली आहे. भिगवण स्टेशन येथील ६५ वर्षाची ही महिला आहे. त्यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी नेल्याची माहिती मिळाल्याने मुलगा त्याची पत्नी आणि दोन मुलांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, मंगळवारी(दि. २८)  रात्री उशिरा त्यांना पुणे औंध येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले . तर त्यांच्यावर भिगवण येथे उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि पॅथॉलॉजीस्ट यांच्यासह १४ जणांना तपासणीसाठी बारामती येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे,अशी   माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भिगवण आणि भिगवण रेल्वे स्टेशन  परिसरातील तक्रारवाडी डीकसळ परिसर सील करण्यात आला आहे.तर शेती साठी शेतकरी यांना ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. एकदा शेतीत गेलेल्या शेतकºयाने
सायंकाळी घरी येण्याची सूचना करण्यात आली आहे.तर भाजीपाला आणि किराणासाठी घरपोच सुविधा पुरविणाºया दुकानदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. परिसरात पुढील तीन दिवस काटेकोर बंद पाळला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटना यांच्याकडून दिली गेली आहे . दवाखाना आणि मेडिकल वगळता सर्व व्यवसाय काटेकोरपने बंद ठेवण्यात येणार आहे .

Web Title: Corona test of 18 people in that bhigvan area patient's 'high' contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.