Corona Test at Home: घरच्या घरी CoviSelf kit ने चाचणी कशी करायची? कोणते अॅप वापरायचे; कधी येणार, माहिती जाहीर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:08 PM2021-05-20T14:08:24+5:302021-05-20T14:13:35+5:30
ICMR approves home-based RAT kit CoviSelf for Covid testing: CoviSelf home Corona test kit ची किंमत वाजवी असली तरीदेखील ते वापरण्यासाठी काही अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत. महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे हे टेस्ट किट केव्हापासून आणि कुठे कुठे उपलब्ध होणार आहे. कोणते अॅप वापरणार जाणून घ्या...
corona testing at home: घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी ICMR ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील पहिल्या कोरोना किटला (Rapid Antigen Kits) परवानगी दिली आहे. याचा फायदा कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोना चाचणी केंद्रांवर होणारी गर्दी तसेच चाचणीसाठी होणारी टाळाटाळ थांबविण्यासदेखील होणार आहे. या होम टेस्ट किटचे नाव CoviSelf असे असून त्याची किंमत 250 रुपये आहे. (Pune's Mylab receives ICMR approval for India's first self-use Rapid Antigen Test kit 'CoviSelf' for COVID-19.)
Black Fungus: ब्लॅक फंगसचा धोका कसा ओळखावा? ही आहेत लक्षणे, उपाय; AIIMS कडून नव्या गाईडलाईन जारी
CoviSelf home Corona test kit ची किंमत वाजवी असली तरीदेखील ते वापरण्यासाठी काही अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत. हे टेस्ट किट घेतल्यानंतर तुम्हाला एक गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अॅपल स्टोअरवरून एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपचे नाव MyLab Coviself App असे आहे. याची माहिती तुम्हाला कोव्हिसेल्फ टेस्ट किटवर देखील मिळणार आहे. (To use self-use Rapid Antigen Test kit 'CoviSelf' you have to download MyLab Coviself App.)
कधी उपलब्ध होणार?
Rapid Antigen Kits to conduct Covid test at home:आता महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे हे टेस्ट किट केव्हापासून आणि कुठे कुठे उपलब्ध होणार आहे. याची माहिती CoviSelf उत्पादक कंपनी Mylab Discovery Solutions चे संचालक सुजित जैन यांनी दिली आहे. CoviSelf द्वारे चाचणी घेण्यासाठी केवळ दोन मिनिटे लागणार आहेत. तसेच हे किट 15 मिनिटांत रिझल्ट देणार आहे. CoviSelf किट हे पुढील आठवड्याच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होणार आहे. जवळपास 7 लाखांहून अधिक मेडिकलमध्ये ते उपलब्ध केले जाणार आहे. तसेच कंपनीच्या ऑनलाईन पार्टनर म्हणजेच ऑनलाईन औषधे विकणाऱ्या कंपन्यांकडे देखील हे किट उपलब्ध केले जाणार आहे. देशातील जवळपास 90 टक्के पिन कोडवर हे किट कसे पोहोचेल हे पाहिले जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
Pune's Mylab receives ICMR approval for India's first self-use Rapid Antigen Test kit 'CoviSelf' for COVID-19.
— ANI (@ANI) May 20, 2021
"This test is for self-use. If you test positive via this there's no need for RT-PCR test as per ICMR. Any adult can use this kit by reading our manual,"says Director pic.twitter.com/3Rz59rc72O
महत्वाचे म्हणजे ही कंपनी पुण्याची आहे. ICMR ने या किटला परवानगी देताना काही नियम अटी घातल्या आहेत. याची माहिती खाली दिलेल्या लिंकवर मिळणार आहे. (ICMR issued detailed guidelines on who can use it and how.)
या किटद्वारे स्वत:च स्वत:ची चाचणी करता येणार आहे. जर या किटवर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आलात तर पुन्हा RT-PCR चाचणी करण्याची गरज नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. कोणीही हे किट कसे वापरावे हे वाचून किंवा व्हिडीओ पाहून कोरोना चाचणी करू शकणार आहे, असे जैन म्हणाले.