नीरेत सोमवार पासून व्यापारी व फेरीवाल्यांची कोरोना चाचणी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:27+5:302021-04-04T04:11:27+5:30

-- नीरा : "नीरा येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही रुग्णवाढ धोक्याची आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने पुढील आठवडाभर ...

Corona test for traders and hawkers from Monday in Neerut: | नीरेत सोमवार पासून व्यापारी व फेरीवाल्यांची कोरोना चाचणी :

नीरेत सोमवार पासून व्यापारी व फेरीवाल्यांची कोरोना चाचणी :

googlenewsNext

--

नीरा : "नीरा येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही रुग्णवाढ धोक्याची आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने पुढील आठवडाभर कडक निर्बंध लावले आहेत. यादरम्यान सुपर स्प्रेडर असलेल्या व्यावसायीक, भाजी विक्रेते, फेरीवाले व ज्या लोकांचा संपर्क जास्त लोकांशी होत आहे अशांची कोरोना चाचणी नीरा प्रथमिक आरोग्य केंद्रात केली जाणार आहे. कोरोनाची चाचणी न केल्यास व्यावसायीकांवर निर्बंध लादले जातील" असा इशार नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय म्हवान दिला आहे.

आज नीरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. म्हवान बोलत होते. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय म्हवान, आरोग्य सेविका बेबी तांबे, ग्रामसेवक मनोज डेरे, नीरा पोलीस दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक कैलास गोतपागर, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी सह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकट्या नीरा शहरात आज रोजीपर्यंत ४६९ रुग्ण बाधित झाले, उपचाराअंती ४२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, ४५ रुग्ण आज रोजी अँक्टीव्ह तर म्रुत्य १३ झाले आहेत. त्यामूळे आज नीरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन कमिटीची तातडीची बैठक घेण्यात आली. कोरोनाचं फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून विविध उपाय योजना करण्या बाबत निर्णय घेण्यात आले. सर्व दुकाने सायंकाळी सहा नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. तर व्यापारी, फेरीवाले, भाजी व फळ विक्रेते यांची सोमवार दि.०५ पासून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ग्रामपंचायतीने नेमणूक केलेले स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत होम टू होम सर्वे करण्यात येणार आहे.

कैलास गोतपागर : उपनिरीक्षक नीरा पोलीस दुरक्षेत्र. "जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी नीरा शहरात केली जाणार आहे. विना मास्क फिरणाऱ्या व वाहन चालकांवर तसेच संध्याकाळी ६ नंतर दुकाने सुरु ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. यापुढे वाहन चालकांवर५००, तर व्यावसायीकांकडून १००० रुपयांच्या दंडाची रक्कम वसुल केली जाणार आहे.

Web Title: Corona test for traders and hawkers from Monday in Neerut:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.