कोरोनामुळे मतदानासाठी घेतली विशेष खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 AM2020-12-03T04:20:53+5:302020-12-03T04:20:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदाना ...

Corona took special precautions for voting | कोरोनामुळे मतदानासाठी घेतली विशेष खबरदारी

कोरोनामुळे मतदानासाठी घेतली विशेष खबरदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदाना पार पडले. कोविड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात मतदान केंद्र परिसरात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेतली. सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करून, मतदानासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या साहित्याचे कीट पुरविले आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांमध्ये देखील सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्रावर येणाऱ्या मतदारांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येत होती. मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन केले होते. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व सहायकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्येष्ठ मतदारांबाबत देखील स्वतंत्र सूचना दिल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला होता, यामुळेच जिल्हयात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. तसेच मतदानाची टक्केवारी देखील समाधानकारक झाली असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Corona took special precautions for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.