जिल्हाधिकारी कार्यालयातील ५८ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:56+5:302021-02-05T05:00:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच आता दुसऱ्या टप्प्यात फ्रन्ट लाईनवर असलेल्या महसूल आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच आता दुसऱ्या टप्प्यात फ्रन्ट लाईनवर असलेल्या महसूल आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास बुधवारपासून (दि. ३) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ५८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्याची माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी व लसीकरण समन्वयक अस्मिता मोरे यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे गेले वर्षभर देशातील नागरिक हैराण झाले आहेत. यात या महामारीचा सर्वाधिक फटका आरोग्य कर्मचारी आणि यासाठी आवश्यक उपाययोजना करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना बसला आहे. यामुळेच देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करताना शासनाने पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणे बंधनकारक केले. त्यानंतर कोरोनामध्ये फ्रन्ट लाईनवर काम करणाऱ्या महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे निश्चित केले. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. आता दुसऱ्या टप्प्यात महसूल कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले आहे. बुधवारी औंध जिल्हा रुग्णालय येथे महसूल कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले. यात पहिल्या दिवसी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि कर्मचारी अशा एकूण ५८ लोकांना लसीकरण केले.