अहिनेवाडीत कोरोना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:14+5:302021-09-14T04:14:14+5:30
ग्रामपंचायत अंतर्गत बहुतांश भाग हा आदिवासी असल्याने लसीकरणाबद्दल समज- गैरसमज बाळगून लस घेण्यास नकारात्मक असलेल्या ग्रामस्थांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचे ...
ग्रामपंचायत अंतर्गत बहुतांश भाग हा आदिवासी असल्याने लसीकरणाबद्दल समज- गैरसमज बाळगून लस घेण्यास नकारात्मक असलेल्या ग्रामस्थांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचे फायदे समजावून सांगण्यात आले. लसीकरणाचे हे शिबिर खास आदिवासी बांधवांसाठी आयोजित करण्यात आले असल्याचे सरपंच भीमाताई खंडागळे यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच स्वप्नील अहिनवे, सरपंच उपसरपंच व प्रशासनासोबत पहिला व दुसरा डोस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अहिनवेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, महादेव काळे, सुप्रिया डुंबरे, सविता अहिनवे, ग्रामसेवक संतोष ताजवे आणि कर्मचारी प्रकाश गोंदे, आशा वर्कर कल्पना अहिनवे, नंदा गोंदे, मुख्याध्यापिका ललिता बरबडे, पोलीस पाटील सुनीता गोंदे, आरोग्य सेवक डॉ. नवेज आणि आरोग्य पथक यांनी नियोजन केले.
ऑनलाईन नोंदणीसाठी शैलेश डुंबरे, सुयेशा डुंबरे, प्रवीण डुंबरे, समीर जाधव, अरुण जाधव, स्नेहल डुंबरे यांचे सहकार्य लाभले. या वेळी देवराम जाधव, देवजी जाधव, गणेश फलके, वाल्हामामा जाधव, पुंडलिक काळे, नितीन काळे, निवृत्ती काळे, तेजस डुंबरे, हेमराज डुंबरे, भीमाजी जाधव, नितीन खंडांगळे, माऊली तांबे, प्रकाश मोरे या ग्रामस्थांनीही नियोजन केले. ग्रामस्थांनी आदिवासी ग्रामस्थांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध केल्याने ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्र यांचे आभार मानले.