Corona Vaccination: पुण्यात ४५ पेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी शनिवार-रविवार लसीकरण केंद्र बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:05 PM2021-04-30T23:05:10+5:302021-04-30T23:06:25+5:30

लसीकरणाची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे .यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी साईट सुरु झाल्यानंतर या दोन रुग्णालयाची निवड केली असेल  त्या लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे.

Corona Vaccination: Citizens between the ages of 18 and 44 will get the vaccine, while vaccination centers for those over 45 will be closed for 2 days. | Corona Vaccination: पुण्यात ४५ पेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी शनिवार-रविवार लसीकरण केंद्र बंद राहणार

Corona Vaccination: पुण्यात ४५ पेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी शनिवार-रविवार लसीकरण केंद्र बंद राहणार

Next

पुणे -  १ मे २०२१ पासून पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या सुचनेनुसार १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड लसीकरण देण्यात येणार असून या लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फ कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ व राजीव गांधी रुग्णालय, येरवडा या दोन रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध करण्यात आली  आहे.

लसीकरणाची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे .यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी साईट सुरु झाल्यानंतर या दोन रुग्णालयाची निवड केली असेल  त्या लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे. दिनाक १ मे २०२१ रोजी ३५० इतक्याच लाभार्थ्यांनाच को विन पोर्टलवर नोंदणी करून रुग्णालय निवडता येणार आहे .सदर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉट नुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर जावयाचे आहे.वरील दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंदणी न करता थेट जावू नये त्यांना लस मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

शनिवार दिनांक १ मे २०२१ व रविवार दिनांक २ मे २०२१ रोजी ४५ वर्षापुढील लाभार्थ्यासाठी असलेली पुणे महानगरपालिकेची इतर सर्व लसीकरण केंद्रे लस साठा उपलब्ध नसल्याकारणाने बंद राहणार आहेत.जर सोमवार दिनांक ३ मे २०२१ पूर्वी शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास ४५ वर्षापुढील नागरीकाकरिता पुणे महानगरपालिकेकडील लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येतील. तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

पुणे शहरात शनिवारी आणि रविवारी कोरोना लसीकरण बंद राहणार ! पुणे मनपा हद्दीत ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठीचे लसीकरण शनिवारी आणि रविवारी बंद राहणार असून लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना निर्गमित करण्यात येतील. याची पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती पुण्याचे महापौर मुरळीधर मोहोळ यांनी दिली आहे. 

Web Title: Corona Vaccination: Citizens between the ages of 18 and 44 will get the vaccine, while vaccination centers for those over 45 will be closed for 2 days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.