Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:44 PM2021-07-06T21:44:01+5:302021-07-06T21:45:07+5:30

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ७८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध 

Corona Vaccination : Corona vaccines available at 84 centers of Pune Municipal Corporation | Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

Next

पुणे : महापालिकेच्या ८४ केंद्रांवर बुधवारी लसीकरण केले जाणार आहे. ७८ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असून या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.  

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९ लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोव्हीशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ५० टक्के लस  आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. तर, ५० टक्के लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे. 

अन्य ६० केंद्रांवर कोव्हीशिल्ड साठ्यापैकी ४० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ८४ दिवसांपूर्वी (१४ एप्रिल पूर्वी ) पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़.
-----
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोव्हक्सीन लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस ८ जुनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.

Web Title: Corona Vaccination : Corona vaccines available at 84 centers of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.