Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:05 PM2021-06-24T22:05:29+5:302021-06-24T22:05:41+5:30
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.
पुणे : शहरातील महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी (दि.२५) कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.याव्दारे प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्ड लसीचा ७० टक्के ऑनलाईन नोंदणीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर ३० टक्के लस या ऑनस्पॉट नोंदणी करून मिळणार आहेत.
----
२७ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
२७ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
------------------------
४५ वर्षांवरील नागरिकांना एकाच ठिकाणी लस
४५ वर्षांवरील नागरिकांना आज नगररोड येथील जगदगुरू इंटरनॅशनल स्कूल साठेवाडी येथे कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर येथे २० टक्के लस ज्या नागरिकांनी २ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांच्याकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.