Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! कोविशिल्ड,कोव्हॅक्सिननंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस पुण्यात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:03 PM2021-06-25T16:03:53+5:302021-06-25T16:05:20+5:30

स्पुतनिक व्ही लसीला भारतासह एकूण ५५ देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

Corona Vaccination Pune: Important news for Pune citizens! Russia's Sputnik V vaccine arrives in Pune after Covishield, Covaxin | Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! कोविशिल्ड,कोव्हॅक्सिननंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस पुण्यात दाखल 

Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! कोविशिल्ड,कोव्हॅक्सिननंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस पुण्यात दाखल 

Next

पुणे:  कोविशिल्ड,कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' (Sputnik V) ही लस पुण्यात वापरासाठी दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ६०० डोस पुणेकरांसाठी उपलब्ध झाले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोसची किंमत ११४२ रुपये इतकी असणार आहे. लस  स्पुतनिक व्ही लस पुणेकरांना २८ जूनपासून दिली जाणार आहे.या लसीच्या डोससाठी कोविन अ‍ॅप व पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे राहणार आहे.

मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली असून हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून रशियाची स्पुतनिक व्ही लसीचे भारतातील वितरण सुरु आहे.राज्यातील व पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात स्पुतनिक व्ही लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीजच्या ३६ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला होता अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मागील सहा महिन्यांपासून कोरोना लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. मध्यंतरी लसींच्या तुटवड्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती.मात्र, मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्याने लसीकरणं मोहिमेला चांगली गती मिळाली आहे.

कोविशील्ड, कोव्हॅक्सिससह 'स्पुतनिक व्ही' या लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुतनिक व्ही लसीचा दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यायचा आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा उपयोग करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला भारतासह एकूण 
५५ देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या लसीमुळे नागरिकांना लसीकरणासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. स्पुतनिक व्ही लसीमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे.कोरोनाविरुद्ध स्पुतनिक व्ही लस ९२ टक्के प्रभावी आहे.

Web Title: Corona Vaccination Pune: Important news for Pune citizens! Russia's Sputnik V vaccine arrives in Pune after Covishield, Covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.