Corona Vaccination Pune : पुणे महापालिका सुरू करणार 'व्हॅक्सिन ऑन व्हील्स'; वृद्धाश्रम, रुग्णालये, संस्थाना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 09:58 PM2021-05-11T21:58:15+5:302021-05-11T21:58:58+5:30
राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
पुणे : शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून १८ ते ४४, ४५ च्या पुढील वयोगट, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करला लस देण्यात येत आहे. परंतु, अनाथाश्रम, एडग्रस्त मुले, वृद्धाश्रम, आजारी व्यक्ती आदी असहाय घटकांना थेट त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले जाणार आहे. त्याकरिता स्पेशन बस तयार करण्यात आल्या असून या मोहिमेला 'व्हॅक्सिन ऑन व्हील्स' असे नाव देण्यात आले आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
शहाराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत जे लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातच लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच 'इम्युनिटी' कमी असलेल्या या नागरिकांना अधिक धोका होऊ शकतो. या घटकांसाठी ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
पालिकेला या उपक्रमासाठी काही संस्थानी मदत केली आहे. सध्या चार बस तयार करण्यात आल्या आहेत. भविष्यात प्रत्येक प्रभागात एक मोबाईल व्हॅन सुरू करण्याचा विचार आहे. काही संस्थासोबत एममोयूदेखील करण्यात आला आहे.
-----
येत्या काही दिवसात शहरातील लसींचा पुरवठा सुरळीत होईल. त्यानंतर लसीकरणही सुरळीत सुरू होईल असा विश्वास अगरवाल यांनी व्यक्त केला. 'व्हॅकसिन ऑन व्हील्स'द्वारे लसीकरण करताना वयोगटाची अट पाहिली जाणार नाही. तर, आवश्यकता पाहून लास देणार आल्याचे सांगण्यात आले.