Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:54 PM2021-07-16T20:54:36+5:302021-07-16T20:54:52+5:30

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर १८४ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध

Corona Vaccination Pune: Vaccines will be available on Friday at 190 centers of Pune Municipal Corporation | Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

Next

पुणे : महापालिकेच्या एकूण १९० केंद्रांवर गुरूवारी लसीकरण केले जाणार आहे. १८४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असून या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.  

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १८४ लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोव्हीशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ४० टक्के लस  आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. यासोबतच २० टक्के लस २३ एप्रिल पूर्वी पहिला डोस घेतलेल्या आणि ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, २० टक्के लस जागेवर देण्यात येणार आहेत. 
-----
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोव्हक्सीन लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस १८ जुनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.

Web Title: Corona Vaccination Pune: Vaccines will be available on Friday at 190 centers of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.