खेडमधील १० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:13 AM2021-03-16T04:13:03+5:302021-03-16T04:13:03+5:30
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र ही अनेक गावांना जोडलेली असतात त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त ५० ते १०० नागरिकांनाच ...
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र ही अनेक गावांना जोडलेली असतात त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त ५० ते १०० नागरिकांनाच लसीकरण करता येणे शक्य आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी करण्याएवजी ॲपवर ऑनलाइन नोंदणी करुनची लसीकणास यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ज्येष्ठ नागरीकांची अँप वरुन लसीकरण नाव नोंदणी केल्यास संबंधित ज्येष्ठांना गावातच राहुन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या दिवशी कोणत्या वेळेत उपस्थित राहायचे याचा संदेश नोंदवलेल्या मोबाईल वरुन मिळणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी टाळता येणार आहेच पण वारंवार हेलपाटे मारण्यचाही त्रास कमी होईल. त्यामुळे
संबंधित ज्येष्ठांना प्राथमिक केंद्रात लसीकरणासाठी पाठवुन देण्याबाबत गावपातळीवर नियोजन करण्याचे आवाहन प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी केले आहे.