Corona Vaccination : परदेशात जाणाऱ्या २२० विद्यार्थ्यांचे शहरात मंगळवारी दिवसभरात लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:18 PM2021-06-01T20:18:52+5:302021-06-01T20:19:20+5:30

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार व बुधवार असे दोन दिवस लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

Corona Vaccination: Vaccination of 220 students in pune city who going foreign for education on Tuesday | Corona Vaccination : परदेशात जाणाऱ्या २२० विद्यार्थ्यांचे शहरात मंगळवारी दिवसभरात लसीकरण

Corona Vaccination : परदेशात जाणाऱ्या २२० विद्यार्थ्यांचे शहरात मंगळवारी दिवसभरात लसीकरण

Next

पुणेपुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या २२० विद्यार्थ्यांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले. महापालिकेने परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा अडथळा येऊ नये म्हणून या विशेष मोहिमेचे आयोजन केले असून, त्याला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार व बुधवार असे दोन दिवस लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयातील ५ व्या मजल्यावरील लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस उपलब्ध आहे. 

या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी २२० जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, बुधवारी (२ जून रोजी) ५०० जणांचे लसीकरण केले जाणार आहे. आत्तापर्यंत महापालिकेकडे परदेशात जाणाऱ्या शहरातील दीड हजार विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी अर्ज केला आहे. या सर्वांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Web Title: Corona Vaccination: Vaccination of 220 students in pune city who going foreign for education on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.