Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:29 PM2021-03-20T20:29:38+5:302021-03-20T20:31:03+5:30

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

Corona Vaccine : Allow societies to be vaccinated under hospital supervision: Demand of Pune citizens | Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी 

Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी 

Next

पुणे : मोठ्या सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणाला परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातील नागरिकांनी केली आहे. लसीकरण हा सर्वसामान्यांचा हक्क आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये लसीकरण झाल्यास त्याचा फायदा होऊ शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपणही याबाबत विचारणा केली असता राज्य सरकारने आपल्याला परवानगी नसल्याचे सांगितल्याचे म्हणले आहे. काही अडचण निर्माण झाल्यास उपचाराची सुविधा असावी असे सांगत लसीकरण केंद्र हॉस्पिटलमध्येच असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. त्याच पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण व्हावे यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र यानंतरही केंद्रावर जाण्याची भिती आणि व्हॅक्सिन बद्दल गैरसमज यामुळे लोक लसीकरण करणे टाळत आहेत.

या पार्श्वभूमीवर काही रुग्णालयांचे प्रतिनिधी हे सोसायट्यांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देत आहेत. लसीकरणाची याचप्रमाणे सोय उपलब्ध करुन दिली जावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत. 

याविषयी बोलताना पुण्यातले नागरिक रविंद्र सिन्हा म्हणाले,” पुण्यात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून अशी विनंती करत आहोत की पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. दरम्यान पुण्यात ‌अनेक ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जायला त्रास होते आहे. त्यातच रुग्णालये सोय करुन द्यायला इच्छुक आहेत. त्यामुळे वैद्यकीय निगराणी मध्ये लसीकरण करण्यास तसेच अशी केंद्रे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे”.

महापालिकेने मात्र अशी परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या,” आम्ही देखील याबाबत विचारणा केली होती. मात्र लसीकरण झाल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास अडचण येऊ शकते. हे लक्षात घेवूनच सरकारी प्रोटोकॅाल ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातच लसीकरण करणे आवश्यक आले.”

Web Title: Corona Vaccine : Allow societies to be vaccinated under hospital supervision: Demand of Pune citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.