Corona vaccine: २१ जून रोजी १५७ केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध; ८ वाजता ऑनलाईन बुकींग सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 10:22 PM2021-06-20T22:22:29+5:302021-06-20T22:22:43+5:30
२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे़
पुणे : महापालिकेच्या १५७ लसीकरण केंद्रांवर सोमवार दि.२१ जून रोजी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस पुरविण्यात आले आहेत. एकूण साठ्यापैकी ४० टक्के लस या ऑनलाईन, २० टक्के लस या हेल्थ केअर वर्कर,फ्रंट लाईन वर्कर आणि ४५ वर्षावरील नागरिकांना ऑन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे. तर ४० टक्के लस या २९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.
२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्याना दुसरा डोस
२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे़ शहरातील १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा करण्यात आला असून, यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून व ४० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़