पुरंदर तालुक्यातील १५५ दिव्यांग व्यक्तींना दिली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:46+5:302021-06-16T04:14:46+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. १४) ४५ वर्षांवरील दिव्यांगांना कोरोनाची लस देण्यात आली. तर उर्वरित १८ ...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. १४) ४५ वर्षांवरील दिव्यांगांना कोरोनाची लस देण्यात आली. तर उर्वरित १८ वर्षांवरील व्यक्तींना सोमवार दि. २१ रोजी लस देण्यात येणार आहे. तालुक्यात ४५ वर्षांवरील एकूण १३० व्यक्तींना पहिला आणि २५ व्यक्तींना दुसरा असे एकूण १५६ व्यक्तींना डोस देण्यात आला आहे. यापूर्वी २२७ व्यक्तींनी पहिला डोस तर २५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतल्याने एकूण ३५७ व्यक्तींना पहिला डोस तर ५३ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली आहे.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम तपासे, डॉ. किरण राऊत, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, प्रदेश सरचिटणीस गणेशराव जगताप, प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, समितीचे सदस्य संभाजी महामुनी, शिवाजी शिंदे, दत्तात्रय दगडे आदी उपस्थित होते. ——————————————————————————————
फोटो क्रमांक : १४ सासवड लसीकरण
फोटो ओळ ; सासवड (ता. पुरंदर) येथे दिव्यांग व्यक्तींना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले.