Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 08:44 PM2021-08-12T20:44:11+5:302021-08-12T20:45:23+5:30

एका दिवसांत १ लाख लसीकरणाची जिल्ह्याची क्षमता 

Corona Vaccine : Pune district received the highest dose of vaccine on Thursday; Vaccination will increase | Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

Next

पुणे : लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता. लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे डोस मिळावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर गुरूवारी जिल्ह्याला पहिल्यांदाच सव्वा दोन लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला. यामध्ये २ लाख १२ हजार कोव्हिशिल्ड आणि १४ हजार ४०० कोव्हॅकसिन लसींचा समावेश आहे. यापूर्वी २८ जुलैला २ लाख १२ हजार ५०० लसींचा पुरवठा झाला होता.

कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लसींचा पुरवठा योग्य पद्धतीने झाल्यास लसीकरण वाढवणेही शक्य होणार आहे. याच दृष्टीने लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या एका दिवशी ५० ते ६० हजार लसीकरण केले जात आहे. आजपर्यंत पाच वेळा जिल्ह्यातील लसीकरण एक लाखांहून जास्त झाले आहे.

गुरूवारी पुणे जिल्ह्याला मिळालेल्या २ लाख १२ हजार कोव्हीशिल्ड लसींपैकी पुणे ग्रामीणला ९१ हजार, पुणे शहराला ७४ हजार तर पिंपरी चिंचवडला ४७ हजार लसी पुरवल्या जाणार आहेत.
जिल्ह्याला मिळालेल्या १४ हजार ४०० कोव्हॅकसिन लसीपैकी पुणे ग्रामीणला ६ हजार २००, पुणे शहराला ५ हजार तर पिंपरी चिंचवडला ३ हजार २०० डोस दिले जाणार आहेत. --

----
पहिल्यांदाच ग्रामीण भागाला सर्वाधिक पुरवठा
पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत लोकसंख्या जास्त असतांनाही ग्रामीण भागावर लसवाटपात अन्याय होत होता. या बाबत लोकमतने वृत्त दिले होते. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने ग्रामीण भागात लसीकरण क्षमता असतांनाही वेगाने करता येत नव्हते. सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोना बाधित असून ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे. मात्र, अपुऱ्या लसपुरवठ्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक लसपुरवठ्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवता येणार आहे.

....

ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात लसीकरण होत आहे, तिथे लसींचे जास्त डाेस देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. जिल्ह्याला आठवड्यातून दोनदा डोस प्राप्त होणार आहेत. त्यातील एका खेपेस जास्त लसी तर दुसऱ्या वेळी छोटा साठा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाला गती येईल.
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग

-----
कोव्हीशिल्ड
पुणे ग्रामीण : ९१०००

पुणे शहर : ७४०००
पिंपरी चिंचवड : ४७०००

----
एकूण : २ लाख १२ हजार

कोव्हॅक्सीन 

पुणे ग्रामीण : ६२००

पुणे शहर : ५०००
पिंपरी चिंचवड : ३२००

जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात ३६ लाख २ हजार ६२४ लाभार्थी आहेत. यातील १७ लाख ६ हजार ७५० जणांनी लस घेतली आहे. पुणे शहरात ३० लाख ९२७ लाभार्थी असून २१ लाख ८३ हजार २०९ जणांनी लस घेतली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये१९ लाख ३६ हजार १५४ लाभार्थी असून त्यातील ८ लाख८७ हजार ३ ४४ जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्यातील एकुण ८५ लाख ३९ हजार ७०६ लाभार्थ्यांपैकी ४७ लाख ७७ हजार ३०३ एवढ्या जणांनी लस घेतली असून ७६ टक्के लसीकरण झाले आहे.

Web Title: Corona Vaccine : Pune district received the highest dose of vaccine on Thursday; Vaccination will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.