Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ झाले कोरोनामुक्त; १ हजार १०१ नव्या रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 10:13 AM2020-08-06T10:13:20+5:302020-08-06T10:14:49+5:30
रूग्णांलयात ६७६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू
पुणे : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात १ हजार १०१ रुग्णांची वाढ झाली आहे़. तर दिवसभरात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ६७६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४२५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार २७३ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ६० हजार ५९७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ७५८ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ४२ हजार ४१० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ४२९ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ६९८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा २ लाख ९७ हजार ७३७ वर गेला आहे.