Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार ६१७ नवे कोरोनाबाधित; ३१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:17 AM2020-08-27T02:17:15+5:302020-08-27T02:18:49+5:30
प्रत्यक्ष सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ९४०
पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार ३१७ झाली असून बुधवारी दिवसभरात १६१७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १३६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८१२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ९४० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८१२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ७४४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार १०८ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७० हजार २६९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ९४० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार १६४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख २० हजार ४५८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.