Corona virus : पुणे शहरात शनिवारी १ हजार ६५८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; ५० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 08:19 AM2020-09-20T08:19:06+5:302020-09-20T08:20:02+5:30
शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार २४८ कोरोनामुक्त
पुणे : शहरात शनिवारी ५ हजार ९१९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने अँटिजेन चाचणीचे प्रमाण कमी करून स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये १ हजार ६५७ नागरिकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आल असले तरी, आज आरटीपीसीआरव्दारे केलेल्या तपासणीचे अहवाल हे २४ तासांनी प्राप्त होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार २४८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर विविध हॉस्पिटलमध्ये ९५७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९५ व्हेंटिलेटरवर, ४६२ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५३० जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण हे पुण्याबाहेरील होते.
शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३० हजार ८१ झाली असून, आतापर्यंत १ लाख ९ हजार ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ६६४ झाली आहे.
--------------------------------