Corona virus : पुणे विभागात रविवारी १ हजार ७११ नवे रूग्ण; ४० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 10:04 PM2020-07-12T22:04:50+5:302020-07-12T22:06:15+5:30
पुणे जिल्ह्यात रविवारी 1 हजार 436 नवीन रुग्ण , एकूण रुग्णसंख्या 36 हजार 964 वर
पुणे : पुणे विभागात १ हजार ७११ नवे कोरोना बाधित रूग्ण अढळून आले असून विभागातील एकूण रूग्णांची संख्या ४४ हजार ७५ झाली आहे.सध्या विभागात १६ हजार २०९ अॅक्टीव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण १ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच विभागातील २६ हजार ४१९ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ५९१ रुग्ण गंभीर आहेत. पुणे विभागातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९.९४ टक्के तर मृत्यूचे प्रमाण ३.२८ टक्के इतके आहे, असे माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात १ हजार ७११ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ४३६, सातारा जिल्ह्यातील ५१, सोलापूर जिल्ह्यातील १२२, सांगली जिल्ह्यातील २७ तर कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ रूग्णांचा समावेश आहे.विभागात शनिवारी ४० रूग्णांचा मृत्यू झाला.
पुणे जिल्हयातील ३६ हजार ९६४ बाधीत रुग्ण असून २२ हजार १८० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टीव रुग्ण संख्या १३ हजार ७६७ असून त्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार ५, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २ हजार ८३१ व पुणे कॅन्टोंन्मेंट ७७ , खडकी विभागातील ५३, ग्रामीण क्षेत्रातील ७३५, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ६६ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात आत्तापर्यंत एकूण १ हजार १७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ८१२, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १०६ व पुणे कॅन्टोंन्मेंट मधील २५, खडकी विभागातील १३, ग्रामीण क्षेत्रातील ४१, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील २० रुग्णांचा समावेश आहे. तसेच ४०२ रुग्ण गंभीर आहेत. जिल्हयामध्ये बरे होणाऱ्य रुग्णांचे प्रमाण ६०.०० टक्के तर मृत्यूचे प्रमाण २ .७५ टक्के इतके आहे.
सातारा जिल्हयात १ हजार ५४३ बाधित रुग्ण असून ९५० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या साता-यात ५२८ अॅक्टीव रुग्ण असून एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात २ हजार ८२१ कोरोना बाधित रुग्ण असून २ हजार १९३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात १ हजार ३०१ अॅक्टीव रुग्ण असून एकूण ३२७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील ६०८ बाधित रुग्ण असून २९३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तसेच अॅक्टीव रुग्ण ३०० असून एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिल्हयात १ हजार १३९ कोरोना बाधित रुग्ण असून ८०३ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.सध्या जिल्ह्यात अॅक्टीव्ह ३१३ रूग्ण असून एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.