Corona Virus : पुणे शहरात गुरुवारी ११५६ कोरोनाबाधित झाले बरे; १ हजार ९१ रूग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 10:20 PM2020-08-13T22:20:37+5:302020-08-13T22:21:18+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ७१२
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गुरूवारी १ हजार ९१ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७० हजार ३२६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १ हजार १५६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ७३७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ७१२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २८९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ५६४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६५६ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५३ हजार ९५८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ७१२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ३३५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ४२ हजार ५८९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.