Corona virus : पुणे शहरात सोमवारी १२५६ रुग्ण झाले बरे; एकूण ८८४ रुग्ण वाढले : ३७ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 09:15 PM2020-09-21T21:15:18+5:302020-09-21T21:17:26+5:30
विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ ; ३ हजार ५३६ रुग्ण ऑक्सिजनवर
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोमवारी दिवसभरात ८८४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १२५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३७२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४६० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ५३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १८ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार १२१ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार २५६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १२ हजार १७२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ६६५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ३७२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६९७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ६२९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.