Corona virus : पुणे विभागातील १३ हजार ९१७ रुग्ण कोरोनामुक्त,९५९ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:33 AM2020-06-27T02:33:40+5:302020-06-27T02:35:21+5:30
पुणे विभागातील एकूण कोरोनाबधितांची संख्या २३हजार १५९ इतकी झाली आहे.
पुणे : पुणे विभागातील १३ हजार ९१७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून, विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २३ हजार १५९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही ८ हजार २८३ इतकी आहे.
विभागात कोरोनाबाधीत एकुण ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४६३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.०९ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण ४.१४ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. सदर आकडेवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे.
विभागात पुणे जिल्हयातील १८ हजार ८४० बाधित रुग्ण असून कोरोना बाधित १० हजार ८८९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार २९४ आहे. तर जिल्यातील एकूण ६५७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला ३७३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५७.८० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ३.४९ टक्के इतके आहे.
गुरुवारच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण १ हजार ११० ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९३५ , सातारा जिल्ह्यात २४, सोलापूर जिल्ह्यात १३१, सांगली जिल्ह्यात ७ तर कोल्हापूर जिल्ह्यात १३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण १ लाख ५६ हजार ४७६ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १ लाख ५५ हजार ४० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ४३६ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १ लाख ३१ हजार ५५४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून, २३ हजार १५९ नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
-----------