Corona virus : बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या १३ वर , मुर्टि येथील रुग्णाच्या मुलाला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:38 PM2020-05-20T14:38:37+5:302020-05-20T14:42:47+5:30
पुणे, मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला.
बारामती : बारामतीत १३ वा तर तालुक्याच्या ग्रामीण भागात सहावा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यातील मुर्टि येथे येथील रुग्णाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला आहे. त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मुर्टी येथील रुग्ण मुंबई येथून त्याच्या घरी आला होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे १८ मे रोजीच स्पष्ट झाले आहे.या कोरोना संक्रमितरुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये ९ व्यक्तीची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये रुग्णाचा मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे . इतर व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह आली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर ,तर बारामतीत एकुण संख्या १३ वर जाउन पोहचली आहे. नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत एकुण १२ सापडले आहेत. तसेच दोघाजणांचा कोरोनामुळे मृत्यू आला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फळ येथील रुग्णावर मुंबईत, तर माळेगाव,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथील रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.
पुणे, मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात आता हे रुग्ण वाढण्याची भीती आहे. अकरावारुग्ण सापडल्याने बारामती तालुका धस्तावला आहे.