Corona virus : बारामतीत सापडला १४ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, एमआयडीसीतील कल्याणीनगर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:01 PM2020-05-23T12:01:53+5:302020-05-23T12:02:29+5:30
पुण्याहून घरी आलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा
बारामती : बारामतीत शहरात १४ वा एमआयडिसी तील कल्याणीनगर येथे कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण ३० वर्षीय युवक असून तो पुण्याहून घरी आला होता.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने यांनी याबाबत माहिती दिली .
त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. हा रुग्ण पाच दिवसांपूर्वी त्याच्या घरी आला होता. त्याला कोरोना चा संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण आढळले आहेत .
बारामतीत एकुण संख्या १४वर जाउन पोहचली आहे. नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्याकामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिकअंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे आहे .कल्याणी परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आला आहे .
शहरात कल्याणीनगर श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत . कट्फळ येथील रुग्णावरमुंबईत, तर माळेगाव,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथील रुग्णावर देखील बारामती येथेउपचार सुरू आहेत.
आज सापडलेला रुग्ण पुणे येथून आला आहे .
पुणे मुंबई येथून गावी येणा?्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतच आहे. बारामती २८ एप्रिल ला कोरोना मुक्त झाले होते .शहरातील सर्व दुकाने नुकतीच सुरू करण्यात आली आहेत .आॅरेंज झोन मधीलशहरासमोर आता अडचणीत वाढ होणार आहे .