Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १५१२ नवीन कोरोनाबाधित; ४२ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 10:20 PM2020-09-24T22:20:34+5:302020-09-24T22:21:20+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ४४९
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरुवारी दिवसभरात १५१२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १३२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ४४९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ५१५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १८ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २५५ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १६ हजार ६२६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ४४९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ६४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ९४९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.