Corona virus : पुणे शहरात शनिवारी १ हजार ५२१ नवीन कोरोनाबाधित ; ६९३ जण झाले कोरोनातून बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:16 AM2020-07-26T02:16:23+5:302020-07-26T02:19:45+5:30
एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ६५ वर; २० जणांचा झाला मृत्यू
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी १ हजार ५२१ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४७ हजार ६५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६९३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १८ हजार ४९४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ११५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात २० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११५३ झाली आहे. दिवसभरात एकूण ६९३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४१८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १८ हजार ४९४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ९० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख ४१ हजार ५४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.