Corona Virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १५७७ रुग्ण वाढ; ३३ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:28 PM2020-08-22T22:28:11+5:302020-08-22T22:31:06+5:30
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३४६ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ७२ हजार १७० झाली असून शनिवारी दिवसभरात १५७७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १४२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८०४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८७४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३१६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ६०४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ९५० झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४२७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८७४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ८९१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ९७ हजार ९२७ रूग्णांची तपासणी करण्त आली आहे.