Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १५९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, ७७९ जण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:59 IST2020-07-24T10:55:29+5:302020-07-24T10:59:23+5:30
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ६५

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १५९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, ७७९ जण झाले कोरोनामुक्त
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गुरूवारी १ हजार ५९९ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४४ हजार ६५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७७९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५८९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ५३ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५०९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात ३६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११०४ झाली आहे. दिवसभरात एकूण ७७९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २५ हजार ९०८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १७ हजार ५३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ६६५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख २९ हजार ७०४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.