Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:05 PM2020-07-21T23:05:39+5:302020-07-21T23:10:02+5:30

सध्या केवळ ५० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय

Corona virus : 1600 beds to get 'oxygen' in Pune district; 16 crore fund sanction | Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next
ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांचीबारामती, इंदापुर, मंचर, दौंड व भोर या पाच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकुण ४०० खाटा१९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे ५७० खाटासर्व रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत पाईपद्वारे ऑक्सिजन पोहचविला जाणार

राजानंद मोरे-
पुणे : औंध येथील जिल्हा रुग्णालयातील सर्व ३०० खाटांसह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयातील सुमारे १६०० खाटांना ' ऑक्सिजन ' मिळणार आहे. सर्व रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत पाईपद्वारे ऑक्सिजन पोहचविला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही दिवसांपुर्वी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून काही ठिकाणे कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऑक्सिजनची भासणाऱ्या रुग्णांना उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची असते. औंध येथील रुग्णालयामध्येही ३०० खाटा आहेत. मात्र सध्या केवळ ५० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे. त्यामध्ये एकुण १६ अतिदक्षता विभागातील बेड आहेत. त्यासाठी दोन ठिकाणी ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर लावावे लागतात. दररोज किमान १०० जम्बो सिलेंडर लागतात. एका सिलेंडरची क्षमता सुमारे ४६ लिटरची असते. त्यामुळे प्रशासनाकडून सकाळी ५० व सायंकाळी ५० असे १०० सिलेंडर कंपनीकडून भरून आणले जातात. त्यामध्ये खंड पडल्यास रुग्णांच्या जीवावर बेतु शकते. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात एकाच ठिकाणी सुमारे ६ हजार लिटर क्षमतेची टाकी उभारली जात आहे. तिथून सर्व खाटांसाठी पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा होईल. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही.
जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच बारामती, इंदापुर, मंचर, दौंड व भोर या पाच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकुण ४०० खाटा आहेत. तर एकुण १९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे ५७० खाटा आहेत. सध्या या रुग्णालयांमध्ये गरजेनुसार ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो. पण कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. त्याचा ताण पुणे शहरावर येऊ लागला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सर्व खाटांना पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऑक्सिजन खाटांची उपलब्धता वाढणार आहे. बारामती येईल महिला रुग्णालयामध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे.
--------
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर औंध जिल्हा रुग्णालयासह ५ उपजिल्हा व १९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जात आहेत. त्यांना औंध येथील काम पुढील १५ दिवसांत पुर्ण करण्याची विनंती केली आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातही पुरेशा ऑक्सिजन खाटा उपलब्ध होणार आहेत.
- डॉ. अशोक नांदापुरकर
जिल्हा शल्यचिकित्सक
-----------------------
पाईपद्वारे आॅक्सिजन पुरवठा होणाºया खाटा
औंध जिल्हा रुग्णालय - ३००
उपजिल्हा रुग्णालये - बारामती - १००
इंदापुर - १००
मंचर - १००
दौंड - ५०
भोर - ५०
ग्रामीण रुग्णालये - १९ - प्रत्येकी ३० खाटा
------------

Web Title: Corona virus : 1600 beds to get 'oxygen' in Pune district; 16 crore fund sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.