Corona Virus: पुणे शहरात दिवसभरात १ हजार ६६९ रुग्ण वाढले : ३३ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:04 PM2020-08-20T20:04:16+5:302020-08-20T20:07:45+5:30
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६२ हजार ३४९ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ७९ हजार ३७ झाली असून गुरुवारी दिवसभरात १६६९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १३८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८०६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३१६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४८५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील ०९ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ८८२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६२ हजार ३४९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८०६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ८२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.