Corona virus : बारामती शहरात सापडला १६ वा कोरोना रुग्ण; २९ वर्षीय तरुणाला लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:23 PM2020-05-27T12:23:34+5:302020-05-27T12:33:52+5:30
बारामती येथील रुग्णालयात २९ वर्षीय तरुणावर उपचार सुरु
बारामती : बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेला १६ वा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण २९ वर्षीय असून त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .त्या रुग्णाचा खासगी रुग्णालयात स्वाब घेण्यात आला होता. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. बारामती शहरातील ७ वा कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकुण संख्या आता १६ वर जाउन पोहचली आहे.
बारामती शहर कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले होते .३० एप्रिल रोजी शहरातील शेवटचा रुग्ण सापडला होता. मंगळवारी (दि.२६) २५ दिवसांनी शहरात कोरोना रुग्ण सापडला आहे .शहरातील पहिला रुग्ण याच परिसरातील श्रीरामनगर येथे सापडला होता .आज सापडलेला रुग्ण श्रीरामनगर लगत असणाऱ्या दूध संघ वसाहतीत सापडला आहे .
नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्याकामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिकअंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे आहे .दूध संघ वसाहत परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफरझोन घोषित करण्यात आला आहे .शहरात कल्याणीनगर श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत , कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत .