Corona virus : पुणे शहरात दिवसभरात १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ;१,५४५ झाले बरे  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:29 PM2020-09-21T12:29:11+5:302020-09-21T12:32:42+5:30

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१

Corona virus :1,700 new corona virus patients were found in a day In the city of Pune ; 1,545 were cured | Corona virus : पुणे शहरात दिवसभरात १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ;१,५४५ झाले बरे  

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ;१,५४५ झाले बरे  

Next
ठळक मुद्देशहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ रविवारी ६ हजार ६७ नागरिकांची तपासणी 

पुणे : रविवारी पुणे शहरात ६ हजार ६७ कोरोना संशयित नागरिकांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्याबरोबरच, अँटिजेन चाचणी करण्यात आली. अँटिजेन चाचणी व शनिवारी तपासणी केलेल्या नागरिकांच्या प्राप्त अहवालामध्ये आज एकूण १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. 
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साडेसहा वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार ५४५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९४ व्हेंटिलेटरवर, ४६७ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५०७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील होते. 
      शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ झाली असून, यापैकी १ लाख १० हजार ९१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ८४  जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१ झाली आहे. आत्तापर्यंत शहरात ५ लाख ७४ हजार ९३२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. 

Web Title: Corona virus :1,700 new corona virus patients were found in a day In the city of Pune ; 1,545 were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.