Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७८९ नवीन कोरोनाबाधित; ४६ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 09:08 PM2020-09-23T21:08:50+5:302020-09-23T21:11:14+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३०७ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात १७८९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३०७ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार २१३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १५ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २१३ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ५१२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १५ हजार २९८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ८१८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ३०७ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ४६३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ८९ हजार ३०९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.