Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३० जण कोरोनामुक्त; १६१७ नवीन रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:49 PM2020-09-05T12:49:16+5:302020-09-05T12:49:31+5:30

आतापर्यंत ८३ हजार ९१५ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले.

Corona virus : 1,830 people released from corona in Pune on Friday; Increase of 1617 | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३० जण कोरोनामुक्त; १६१७ नवीन रुग्णांची वाढ

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३० जण कोरोनामुक्त; १६१७ नवीन रुग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देशुक्रवारी दिवसभरात ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू,यापैकी १८ जण पुण्याबाहेरील

पुणे : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ६१७ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील आहेत.
        पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी पावणे आठपर्यंत विविध रूग्णांलयात ८९१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी ५२९ जण व्हेंटिलेटरवर आहेत़. तर ३ हजार २३३ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 
         आजपर्यंत शहरात एकूण १ लाख २ हजार ७६  जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १५ हजार ७३० इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ८३ हजार ९१५ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत २ हजार ४३१ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        
        -----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ६ हजार ७२३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ४ लाख  ७७ हजार ४७८ वर गेला आहे़ 
------

Web Title: Corona virus : 1,830 people released from corona in Pune on Friday; Increase of 1617

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.