Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १ हजार ९१६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ४३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 09:16 PM2020-09-10T21:16:38+5:302020-09-10T21:19:48+5:30
दिवसभरात १८३८ रुग्ण झाले ठणठणीत बरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरूवारी दिवसभरात १९१६ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १८३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ७१२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ४२० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २० रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ६६८ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ८३८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९४ हजार ४५२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख १३ हजार ८३२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १६ हजार ७१२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७९५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख १४ हजार ६६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.