Corona virus : पुणे शहरात सोमवारी १९६ तर पिंपरीत ९५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 11:33 AM2020-12-15T11:33:09+5:302020-12-15T11:34:36+5:30

Pune शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ५९  इतकी

Corona virus: 196 in pune city and 95 in pimpri new corona patients on monday | Corona virus : पुणे शहरात सोमवारी १९६ तर पिंपरीत ९५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १९६ तर पिंपरीत ९५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

googlenewsNext

पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १ हजार ९२१ संशयितांची तपासणी करण्यात आली.तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.२० टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२४ जण व्हेंटिलेटरवर आहेत.  तर शहरातील आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या आत कायम असून, आजमितीला ही संख्या ७९६ इतकी आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ५९  इतकी आहे. आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५४३ इतकी  झाली आहे.

शहरात आजपर्यंत ८ लाख ६६ हजार ३०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७४ हजार २०९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६४ हजार ६०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

======================

पिंपरीत 132  जण कोरोनामुक्त

पिंपरी  :  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून औद्योगिकनगरीत दिवसभरात ९५ जण पॉझिटिव्ह आढळले असून १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर १ हजार ६३६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  कोरोनाने दिवसभरात दोघांचा एकाचा बळी घेतला आहे.  

 पिंपरी-चिंचवड शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवाळीनंतर प्रथमच शंभरच्या आत आली आहे. तसेच तपासण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती.

शहरातील विविध रुग्णालयात १ हजार ६०३ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ३३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ३०१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात १ हजार ६३६ डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ८४१ वर पोहोचली आहे.

..............................

कोरानामुक्तीचा आलेख वाढला

कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून शहर परिसरातील १३२ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार २७६  वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  ९४ हजार ५३२  वर पोहोचली आहे.

..........

दोघांचा मृत्यू

रुग्णवाढीबरोबर शहरातील मृतांची टक्केवारीही कमी होत आहे. दिवसभरात शहरातील दोघांचा तर पुण्यातील चार अशा एकुण सहा जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

Web Title: Corona virus: 196 in pune city and 95 in pimpri new corona patients on monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.