Corona virus : पुण्यात पोलिसांकडून २ लाख १० हजार 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'; उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये वाढले पेशंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 09:18 PM2020-09-14T21:18:35+5:302020-09-14T21:19:21+5:30

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांकडून महापालिकेला संभाव्य बाधितांचा शोध घेण्यास मदत केली जात आहे.

Corona virus : 2 lakh 10 thousand 'contact tracing' by police in Pune | Corona virus : पुण्यात पोलिसांकडून २ लाख १० हजार 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'; उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये वाढले पेशंट 

Corona virus : पुण्यात पोलिसांकडून २ लाख १० हजार 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'; उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये वाढले पेशंट 

Next

पुणे : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना त्यांच्यापासून संभाव्य बाधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न शहर पोलीस दलाच्या पथकांकडून केला जात असून आतापर्यंत तब्बल २ लाख १० हजार १५७ संभाव्य बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. 
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांकडून महापालिकेला संभाव्य बाधितांचा शोध घेण्यास मदत केली जात आहे.याबाबत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या मदतीसाठी पुणेपोलिसांचा एक स्वतंत्र तांत्रिक विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून पुढील काळात कोणत्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढू शकते, कोणत्या भागात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, याची माहिती पुरविण्यात येते. आता शहरातील सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. पोलिसांना उपलब्ध झालेल्या मोबाईल क्रमांकावरुन या बाधितांनी कोणाकोणापर्यंत संसर्ग पसरविला असण्याची शक्यता आहे, त्यांची माहिती दिली जाते.

सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, सहायक निरीक्षक सुनिल गवळी व त्यांची २० जणांची टीम विश्लेषणाचे काम करीत असते. त्यानुसार २७ मे ते ९ सप्टेंबर दरम्यान उपलब्ध झालेल्या मोबाईलक्रमांकानुसार तब्बल १ लाख २ हजार ७८० बाधितांचे विश्लेषण करण्यात आले.त्यात लक्षणे असलेले ७६ हजार ८१४ जण होते. त्याचवेळी २५ हजार ९६६ जणांमध्ये लक्षणे दिसून आली नाही. 

१८ हजार गृहिणी
शहरात कोरोना बाधित झालेल्यांपैकी पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात घरातून केवळ भाजीपाला व अन्य साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडणाºया १८ हजार ५३ गृहिणी बाधित झाल्याचे आढळून आले आहे.

२ हजार ३११ वैद्यकीय क्षेत्रातील
शहरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांमध्येही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले आहे. तब्बल २ हजार ३११ डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांना बाधा झाली आहे. 

२ हजार ४४१ उच्चभ्रु सोसायट्या
सुरुवातीच्या काळात झोपडपट्टी भागात प्रामुख्याने कोरोना फैलाव झाल्याचे दिसून आले होते. आता तो उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये पसरला आहे. शहरातील किमान २ हजार ४४१ उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

पेठांमध्ये वाढतोय संसर्ग
शहरातील पेठ्या, ताडीवाला रोड हे भाग कोरोनामुक्त झाले होते.पण आताच्या पाहणीत या भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा दिसून आले असून तो एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे.

Web Title: Corona virus : 2 lakh 10 thousand 'contact tracing' by police in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.