Corona Virus: पुणे शहरात गुरुवारी २ हजार ९०२ तर पिंपरीत २ हजार ५१८ नवे कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:01 PM2021-05-06T21:01:06+5:302021-05-06T21:01:39+5:30
पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी दिवसभरात २ हजार ९०२ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात २ हजार ९८६ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५७१रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार १८४ झाली आहे. पुण्याबाहेरील २० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण २ हजार ९८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ९२ हजार ४८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ३९ हजार २५१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ८६२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख २९ हजार १०० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
....
दिलासादायक! लसीकरण वाढीबरोबरच निगेटिव्ह अहवालांचे प्रमाण वाढले
पिंपरी : कोरोनाचा आलेख कालपेक्षा चारशेंनी वाढला आहे. तसाचा कोरोमुक्तांचा आलेख कमी झाला आहे. मात्र, निगेटिव्ह येणाºया नागरिकांची संख्या वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. २५१८ जण पॉझिटिव्ह आढळले असून १३१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दाखल रुग्णांची संख्याही कमी होत आहे. लसीकरणातही वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २१०० वर आलेली रुग्णसंख्या आज चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ९ हजार ९६३ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ६ हजार ६८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ हजार ७२८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ८४५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ८ हजार ७३५ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरोनामुक्तही झाले कमी
कोरोनामुक्त रुग्णांचा वाढलेला आलेख कमी झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ९६० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख २३ हजार ९६६ वर गेली आहे.
..................................