Corona virus : पुणे शहरात मंगळवारी २ हजार २२ जण कोरोनामुक्त : १ हजार ८८० नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:27 AM2020-09-09T02:27:47+5:302020-09-09T02:28:02+5:30
शहरात झाल्या ५ लाखाहून अधिक कोविड-१९ च्या तपासण्या
पुणे : शहरात मंगळवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून, दिवसभरात २ हजार २२ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ तर १ हजार ८८० कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे़ आज दिवभरात ५ हजार ४८६ जणांची तपासणी करण्यात आली असून, शहरात कोविड-१९ ची तपासणी करण्यात आलेल्यांची संख्या आता पाच लाखाच्यावर गेली आहे़त.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८० व्हेंटिलेटरवर, ४३२ आयसीयू मध्ये तर ३ हजार ३०६ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू होते. दिवभरात कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १३ जण पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ९ हजार ८३८ झाली असून, आतापर्यंत ९० हजार ६०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ५८४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १६ हजार ६५३ झाली आहे़
आज दिवसभरात ५ हजार ४८६ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाºयांची एकूण संख्या शहरात ५ लाख २५७ इतकी झाली आहे.
----------------------