Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ७८ नवीन कोरोनाबाधित, २ हजार १३ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:21 PM2020-09-09T21:21:50+5:302020-09-09T21:22:01+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६७७ इतकी आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात २०७८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २०१३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ६७७ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ३९७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ६२५ झाली आहे. दिवसभरात एकूण २ हजार १३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९२ हजार ६१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ११ हजार ९१६ झाली आहे. एक्टिव्ह रूग्णांची संख्या १६ हजार ६७७ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७०४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ८४ हजार १८२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे