Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:46 PM2020-06-22T21:46:12+5:302020-06-22T21:47:36+5:30

आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२

Corona virus: 212 new corona infections in Pune city in a day; The total number of patients is 12 thousand 686 | Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण २५५ रुग्णांना सोडले घरी : २८० रुग्ण अत्यवस्थ, ८ जणांचा मृत्यू

पुणे :  शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १२ हजार ६८६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. विविध रुग्णालयातील २८० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ४ हजार ४९६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २१२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २८० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात सोमवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५१८ झाली आहे. दिवसभरात एकूण २५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १९५ रुग्ण, ससूनमधील १३ तर  खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ४९६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २२७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९० हजार ४०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ८४० ससून रुग्णालयात ३३१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार ३२५ रुग्ण उपचार घेत आहेत.

..............................................

पिंपरी शहरात ९४ नवे रुग्ण , ११ जण झाले कोरोनामुक्त

 दिवसभरात रुग्णालयात १६३ संशयित रुग्ण दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून सोमवारी दिवसभरात ९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील चार रुग्णांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८६३ वर गेली आहे. तर ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १६३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका हद्दीबाहेरील दोघांचा समावेश आहे. मृतांची संख्या ५७ वर पोहोचली असून यात महापालिका हद्दीबाहेरील २४ जणांचा समावेश आहे

Web Title: Corona virus: 212 new corona infections in Pune city in a day; The total number of patients is 12 thousand 686

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.