Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:31 PM2020-04-13T21:31:37+5:302020-04-13T21:54:03+5:30

जिल्हाधिकारी घेणार निर्णय 

Corona virus : 22 more places in Pune will be seal : Pune Municipal Corporation proposal | Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव 

Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव 

Next
ठळक मुद्देयापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील

पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मध्यवस्तीला पालिकेने सील केले असून याभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेने आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याविषयी आदेश काढण्यात येणार आहे. 
यापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील करण्यात आलेला आहे. शहरातील काही विशिष्ट परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आणखी २२ ठिकाणांवर सील करणे आवश्यक असल्याचे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 


* ही आहेत नव्याने प्रस्तावित केलेली ठिकाणे : 
१) प्रायव्हेट रोड पत्रा चाळ, लेन क्र.१ ते ४८ व परिसर, ताडीवाला रोड प्रभाग क्र.२०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅन्ड, संत कबीर, अ. ऊ. कॅम्प चौक, क्वॉटर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र.२०
५) विकास नगर,बवानवडी गाव
६) लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणी नगर,बहांडेवाडी रोड प्रभाग. क्र. २६ व २८
८) घोरपडी गाव, इ. ळ. कवडे रोड
९) संपुर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८
१०) सय्यदनगर, महम्मदवाडी-हडपसर प्रभाग क्र. २३, २४ व २६
११) पर्वती दर्शन परिसर,
१२) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजु व उजव्या बाजुस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड, पटेल टाइल्स, विक्रम टाइल्स, इराणी वस्ती सर्व्ह नं. ११ मशिदीचा मागचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न. ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक ४७ परिसराच्या दोन्हीबाजू
१३) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग क्र. १४
१४) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्र. ७
१५) ठकइट रोड कोंढवा प्रभाग क्र. २६
१६) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर
१७) संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर
१८) साई नगर कोंढवा प्रभाग क्र. २७
१९) संपूर्ण विमाननगर प्रभाग क्र. ३
२०) वडगावशेरी परिसर प्रभाग क्र. ५
२१) धानोरी प्रभाग क्र. १
२२) येरवडा प्रभाग क्र. ६

Web Title: Corona virus : 22 more places in Pune will be seal : Pune Municipal Corporation proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.