Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२८ नवे कोरोनाबाधित : तर ३५६ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 08:43 PM2020-11-05T20:43:23+5:302020-11-05T20:45:42+5:30

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७

Corona virus : 228 new corona affected in Pune on Thursday: 356 corona free | Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२८ नवे कोरोनाबाधित : तर ३५६ जण कोरोनामुक्त

Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२८ नवे कोरोनाबाधित : तर ३५६ जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देगुरुवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४८१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी

पुणे : शहरात गुरुवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५६  कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.तर दिवसभरात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये ६ जण पुण्याबाहेरील आहेत.
      पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४८१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी २७५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार ३२८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
      पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी १ लाख ६२ हजार ६४७ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५२ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात २ हजार ३७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus : 228 new corona affected in Pune on Thursday: 356 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.