corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:53 AM2020-04-01T10:53:31+5:302020-04-01T11:30:33+5:30

सध्याची रुग्णांची स्थिती पाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते...

corona virus : 23 patients from six families in Pune district are corona infected | corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

Next
ठळक मुद्देकोरोना सदृश लक्षणे असल्यास स्वत:ला कुटुंबातील अन्य सदस्यांपासून विलग ठेवणे आवश्यक

राजानंद मोरे-  
पुणे : कोरोना विषाणूची लागणझालेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २३ रुग्ण सहा कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा फुगलेला दिसत आहेत. सध्याची रुग्णांची स्थितीपाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना सदृश लक्षणे असल्यास नागरिकांनी स्वत:ला कुटुंबातील अन्य सदस्यांपासून विलग ठेवणे आवश्यक आहे. तसेच विलंबन करता तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्यावा, अन्यथा आपले कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात अडकू शकते,असे आवाहन तज्ञांनी केले आहे. पुणे जिल्ह्यात सोमवार (दि. ३१)पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ वर पोहचली आहे. त्यापैकी १४ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत पुणे शहरात नायडूरुग्णालयामध्ये १९ तर खासगी रुग्णालयामध्ये ५ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यातील पहिला कोरोनागस्त रुग्ण नायडू रुग्णालयात आढळून आला. त्याचे कुटुंब दुबईवरून पुण्यात आले होते . त्यातील पती-पत्नीसह मुलीला कोरोनाची लागण झाली. तर त ज्याकॅबमधून मुंबईतून पुण्याला आले. त्या कॅब चालकालाही संसर्ग झाला. आता ते चौघे ही बरे झाले आहेत. त्याने तर त्यानंतर धनकवडी येथील एकाखासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलल्या ४० वर्षीय महिलेला लागण झाल्याचे समोर आले. त्याने तर याच ंमहिलच्या कुटुंबातील पाच जणांना विषाणूने विळखा घातल्याचे स्पष्ट झाले.त्यामध्ये तिचा पती,  मुलगा, बहीण, तिचा पती व मुलगी यांचा समावेश आहे. कर्वे रस्त्यावरील खासगी रुग्णालयातील कोरोनागस्त रुग्णाच्या कुटुंबातीलही पाच जण कोरोनाबाधित झाल आहेत. त्यामध्ये त्याचे आई-वडील, पत्नी, भाऊ व त्याची पत्नी यांचा समावेश आहे. या दोन कुटुंबातीलच १२ जण उपचार घेत आहेत. मुकूंदनगर भागातील झोपडपट्टीतील दुबईला गेलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या मलीलाही बाधा झाली. तर बर्म्युडा येथून आलेल्या पतीला कोरोनाची बाधा झाल्यानतर त्याच्या पत्नीलाही विळखा पडला. पिंपरी चिचवड मधील एकूण १२ जणांपैकी चार जण ह एकाच कुटुंबातील आहेत. त्यापकी एक जण दुबईवरून आले होते. ते बाधित असल्याने इतर तीन जणांना संसर्ग झाला. जिल्ह्याचा सोमवारपर्यंतचा आकडा ४४ वर गेलेला असताना त्यातील निम्मे रुग्णे सहा कुटुंबातील आहेत.
..........
कोरोना विषाणची लागण झालेले  रुग्ण पहिल्यांदा आपल्या कुटुंबालाच संक्रमित करत असल्याचे रुग्णांच्या स्थितीवरून दिसते. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसले तरी स्वत:ला विलग करणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याला विलंब झाल्यास आपल्या कुटुंबाला पहिला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही दक्षता घ्यायला हवी.- डा. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
............

 

Web Title: corona virus : 23 patients from six families in Pune district are corona infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.