Corona virus : पुणे शहरात मंगळवारी २३३ कोरोनाबाधितांची वाढ ; ३४३ जण झाले ठणठणीत बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 11:04 PM2021-01-05T23:04:31+5:302021-01-05T23:05:46+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ७२५
पुणे : शहरात मंगळवारी २३३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३४३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ३९८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.८ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २२२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४५५ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ७२५ इतकी आहेत. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६५४ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख ३५ हजार ५६० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ९६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.यापैकी १ लाख ७२ हजार ५८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.