Corona virus : दौंड येथे राज्य राखीव दलाच्या कोरोनाबाधित जवानांची संख्या २४ वर ; मुंबईला गेले होते बंदोबस्तासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:03 PM2020-05-08T22:03:11+5:302020-05-08T22:28:30+5:30
राज्य राखीव पोलीस दलाचे ९५ जवान मुंबई येथे बंदोबस्त करुन येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात परतले होते.
दौंड : मुंबई येथे बंदोबस्त करुन पुन्हा नानवीज (ता.) दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाचे १५ जवान कोरोनाबाधित असल्याची माहिती उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली़ आहे. दरम्यान, यापूर्वी ९ जवान बाधित होते. त्यामुळे आता कोरोनाबाधित जवानांची संख्या २४ झाली असून दहिटणे येथील एक जण यापूर्वीच कोरोनाबधित असून तालुक्यात रुग्णांची संख्या २५ झाली आहे.
राज्य राखीव पोलीस दलाचे ९५ जवान मुंबई येथे बंदोबस्त करुन येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात परतले होते. त्या सर्वांना क्वारंटाइन करत त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील १५ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
शहरात राज्य राखीव पोलीस बलाचे ९ जवान पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून उर्वरीत जवानांना दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या अष्टविनायक मंगल कार्यालयात क्वारंटाइन करुन ठेवण्यात आले आहे. हे सर्व जवान गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथून बंदोबस्त करुन आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी गट क्र. ७ ची बधुवार (दि. ६ ) रोजी सायंकाळी ९५ जवानांची तुकडी मुंबई येथून बंदोबस्त करुन आले होते. या सर्व जवानांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही राष्टीय विषाणूजन्य संशोधन संस्थेत (एनआयव्ही)जवानांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील १५ जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . एकंदरितच तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५ झाल्याने शासनाकडून खबरदारीचे योग्य ते ऊपाय सुरु करण्यात आले आहेत .परिणामी गट क्र..पाच आणि सातच्या परिसरात जवानांचे कुटुंब आणि एसआरपीच्या शासकिय कार्यालयाच्या परिसरात धुराळणी फवारणी सुरु करण्यात आले असल्याचे एसआरपीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली खान , डॉ. नितीन भोसले यांनी सांगितले. तसेच नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाइन केलेले जवान आहे तर पॉझिटिव्ह आलेले १५ जवान पुण्याला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. तेव्हा नानवीज प्रशिक्षण केंद्र दौंड शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर आहे. तेव्हा शहरातील लॉकडाऊनची परिस्थिती सध्या आहे तशीच राहणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले. परिणामी किराणा , दुध , दवाखाने , मेडिकल दूकाने ,रेशन दुकानें, वृत्तपञ विक्री सुरु राहणार आहे.