Corona virus : पुणे शहरात मंगळवारी २४१ नवीन कोरोनाबाधित ; २२ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:45 AM2020-10-28T00:45:42+5:302020-10-28T00:46:01+5:30
दिवसभरात 639 रुग्णांना सोडण्यात आले घरी
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी दिवसभरात
२४१ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ६३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६२० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २७४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार ६६७ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.
दिवसभरात २२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार १६३ झाली आहे. दिवसभरात एकूण ६३९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ९१९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६० हजार ८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ६ हजार ४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ३३१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख २५ हजार ७४३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.